के.एस.के.डब्लू महाविद्यालय सिडको चा गौरव
– नाशिक मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान जनजागृती केल्यामुळे विक्रमी मतदानाची नोंद झाली त्यामुळे नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे मतदान जनजागृती चे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल म वि प्र समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालय सिडको नाशिक यांचा विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योत्स्ना सोनखासकर व क्रीडा संचालिका डॉ. मिनाक्षी गवळी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उपजिल्हाधिकारी, शिक्षणअधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच अनेक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.